सातत्याने विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू)

 

 

आमच्या ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्मचा उपयोग करून तुम्ही वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता. हा फॉर्म भरण्यास आणि पूर्ण करण्यास अत्यंत सोपा आहे! तो भरताना तुम्हाला अनेक उपयुक्त सूचना देण्यात येतात. तुम्हाला कोणतीही समस्या जाणवल्यास तुम्ही ग्राहक सेवेशी संपर्क साधून आमच्या प्रतिनिधीशी बोलू शकता.

पात्रता विभागात मूलभूत पात्रता निकष नमूद केलेले आहेत. तुम्ही लवकरच आयआयएफएलकडून वैयक्तिक कर्ज घ्याल, अशी आम्हाला आशा आहे!

तुमच्या ईसीएस किंवा एनएसीएचनुसार तुमच्या सॅलरी अकाउंटमधून तुमच्या महिन्याच्या ईएमआयची रक्कम वजा करण्यात येईल.

आम्ही तुम्हाला खालील अतिरिक्त शुल्क आकारू!

  1. २% पर्यंत प्रकिया शुल्क आकारण्यात येईल
  2. परतफेडीत कसूर झाल्यास लेट पेमेंट आकार घेण्यात येईल

 

पेमेंट विलंबाने केल्याबद्दलचा दंड/बाउन्ससाठी दंड हा मंजुरी/स्वागत पत्रकात नमूद केलेल्या दरानुसार आणि दंडानुसार आकारला जातो. त्यामुळे तुम्ही ईएमआय देण्यात कसूर करू नये अशी आम्ही तुम्हाला शिफारस करतो.

तुमच्याकडे स्कॅनिंग मशीन असेल तर या डिजिटल युगात आमचा कर्जाचा अर्ज किमान कागदपत्रांसह पूर्ण भरता येऊ शकतो.

कर्जाची मुदत १२-६० महिने असू शकते.

अधिक चांगला क्रेडिट स्कोअर प्राप्त करण्यासाठी आणि अधिक कर्ज मिळविण्यासाठी सह-अर्जदाराची भर घालता येऊ शकते. अर्जामध्येच सह-अर्जदारासाठीचाही फॉर्म उपलब्ध असतो. त्यामुळे तुमचा सह-कर्जदार निवडताना नीट विचार करा, असा सल्ला आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो.

कर्ज दिल्याच्या ६ महिन्यांनंतर आम्ही आनंदाने कर्जाची पूर्ण परतफेड स्वीकारतो. म्हणूनच आम्ही मुदतपूर्व परतफेडीसाठी कोणतेही शुल्क आकारत नाही.

तुम्ही तुमच्या संपर्काचा तपशील ऑनलाइन पोर्टलवरून अपडेट करू शकता किंवा कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी आमच्या कॉल सेंटरला क़ॉल करू शकता.

आम्ही एनईएफटी आणि आरटीजीएस ट्रान्सफरच्या माध्यमातून मुदतपूर्व परतफेड आनंदाने स्वीकारतो.

 

May I Help You

Submit