Eligibility Calculator

eligibilitycalculator

पर्सनल लोन एलिजिबिलिटी कॅल्क्युलेटर

आयआयएफएल पर्सनल लोन ईएमआय कॅल्क्युलेटरने तुम्ही तुमची ईएमआयची रक्कम लगेचच जाणून घेऊ शकता. म्हणजे, एखादी कर्जाची रक्कम क्ष% व्याजाने २, ३ किंवा ५ वर्षांसाठी घेतली तर किती ईएमआय भरावा लागेल, हे तुम्हाला लगेच समजू शकते. परंतु जर तुमचे मासिक उत्पन्न, इतर ईएमआय इत्यादी तपशीलाच्या आधारे तुम्हाला किती कर्ज मिळू शकते, हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही आयआयएफएल पर्सनल लोन एलिजिबिलिटी कॅल्क्युलेटरचा उपयोग करून पाहा.

आयआयएफएल पर्सनल लोन तुम्हाला अत्याधुनिक पात्रता कॅल्क्युलेटर उपलब्ध करून देतो. याचा उपयोग करून तुम्हाला किती कर्ज मिळू शकेल, हे तुम्हाला समजतेच, त्याचप्रमाणे तातडीने कर्ज मंजुरी मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता आणि कागदपत्रे अपलोडही करू शकता. याचा अर्थ हा की, तुम्ही ५ मिनिटांत जाणून घेऊ शकता की, तुम्हाला किती कर्ज मिळू शकेल आणि तुम्ही कागदपत्रे ऑनलाइन अपलोडही केली तर पुढील फक्त ८ तासांत तुम्हाला कर्जाची रक्कमही प्राप्त होऊ शकते.

पात्रता तपासा

वैयक्तिक कर्ज देताना आयआयएफएलतर्फे विचारात घेण्यात येणारे मूलभूत पात्रता निकष खालीलप्रमाणे:

पर्सनल लोन पात्रता निकष:

  • कर्ज घेणारी व्यक्ती पगारदार असली पाहिजे
  • मासिक उत्पन्न रु.३५,००० किंवा त्याहून अधिक असावे.
  • अर्जदाराचे वय २५ ते ६० या दरम्यान असावे.
  • अर्जदाराचा सध्याचा पत्ता खालीलपैकी एका शहरात असावा: दिल्ली आणि एनसीआर, मुंबई, ठाणे, वाशी, बंगळुरू, पुणे.
  • अर्जदार त्याच्या सध्याच्या कामाच्या ठिकाणी किमान सहा महिन्यांपासून काम करत असावा.
  • अर्जदाराला कामाचा एकूण अनुभव किमान २ वर्षांचा असावा.

May I Help You

Submit