वैयक्तिक कर्जासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे

आयआयएफएलसह तुम्हाला १००% एंड-टू-एंड (संपूर्ण प्रक्रिया) ऑनलाइन पर्सनल लोन सोल्युशन उपलब्ध होते. एका अर्जाद्वारे तुमची वैयक्तिक कर्जाची पात्रता समजू शकते, आधारच्या माध्यमातून प्रि-फिल (आधीच माहिती भरलेला) अर्ज मिळू शकतो, ५ मिनिटांत तत्काळ मंजुरी मिळू शकते आणि तुम्ही कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करू शकता.

एकदा मंजुरी मिळाली की आयआयएफएलचा प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधेल, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईल आणि तुमच्या पर्सनल लोनची फायनल ऑफर कन्फर्म करेल. तुम्ही आधार ई-स्वाक्षरी सुविधेचा उपयोग करून अॅग्रीमेंटवर डिजिटल स्वाक्षरी करण्याचा पर्यायही निवडू शकता. तुम्ही संमती दिल्यावर ८ तासांच्या आत तुमच्या बँक खात्यात कर्जाची रक्कम जमा होईल.

तुमच्या वैयक्तिक कर्जाच्या अर्जाची प्रक्रिया जलद होण्यासाठी तुम्ही खालील कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी हाताशी ठेवा:

  • ई केवायसीसाठी आधार क्रमांक. तुमच्याजवळ केवळ क्रमांक असणे आवश्यक आहे. अपलोड करण्याची आवश्यकता नाही.
  • ओळखपत्र (ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर याची आवश्यकता नाही)
  • वास्तव्याचा पुरावा (ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर याची आवश्यकता नाही)
  • गेल्या तीन महिन्यांची सॅलरी स्लिप (पगाराची पावती)
  • तुमच्या सॅलरी अकाउंटचे गेल्या तीन महिन्यांचे बँक स्टेटमेंट
  • भाडे करारपत्र (लागू असल्यास)

लक्षात घ्या, तुमचा मोबाईल क्रमांक आधारसाठी यूआयडीएआयकडे नोंदविण्यात आला नसेल तर तुमचे ईकेवायसी होणार नाही.

May I Help You

Submit