प्रश्नोत्तरे - प्रधानमंत्री आवास योजना- सीएलएसएस

 

 

मालमत्तेच्या रचनेत प्रौढ स्त्रीचे सदस्यत्व आवश्यक आहे. कुटुंबात प्रौढ स्त्री सदस्य नसेल, तर मालमत्तेची नोंदणी पुरुष सदस्याच्या नावे होऊ शकते.

  • ईडब्ल्यूएस/एलआयजी - पती, पत्नी आणि अविवाहित अपत्यांचा समावेश कुटुंबात/लाभार्थी कुटुंबात होतो.
  • एमआयजीसाठी- पती, पत्नी आणि अविवाहित अपत्ये.
  • कोणताही प्रौढ कमावता सदस्य (त्याचा किंवा तिचा वैवाहिक दर्जा काहीही असला तरी एक स्वतंत्र कुटुंब समजला किंवा समजली जाते) .

आयआयएचएफएल पत धोरणानुसार खालील कागदपत्रे शाखा अधिकाऱ्याकडे सादर करणे आवश्यक आहे. कागदपत्रांची यादी खाली दिली आहे:

  • कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधारकार
  • नोटराइझ्ड प्रतिज्ञापत्र किंवा अंडरटेकिंग बंधनकारक आहे.

कुटुंबाच्या मालकीचे पक्के घर नसेल तर ते योजनेखाली सबसिडीसाठी अर्ज करू शकते. याशिवाय वार्षिक कौटुंबिक उत्पन्न, शहरी किंवा लगतच्या घरातील मालमत्ता आदी अतिरिक्त निकषांची पूर्तता कुटुंबाने केली पाहिजे.

सबसिडीच्या रकमेचे कालावधीच्या मोबदल्यात समायोजन केले जाणार नाही. या सबसिडीच्या परिणामाचे मुदलाशी समायोजन केले जाईल आणि त्याचा परिणाम ईएमआय अर्थात हप्त्याच्या रकमेत होईल.

  • ई़ब्ल्यूएस/एलआयजी - नाही, गृहनिर्माण आणि शहरी दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मालमत्तेच्या मूल्यावर किंवा क्षेत्रावर काहीही कमाल किंवा किमान मर्यादा नाहीत.
  • एमआयजी १ आणि २ – क्षेत्र १६० चौरस मीरर्स आणि २०० चौरस मीटर्सपर्यंत अनुक्रमे.

योजनेत असे नमूद आहे की- मिशनखाली केंद्रीय मदत मिळवण्यासाठी पात्र ठरण्याकरता, लाभार्थी कुटुंबाच्या मालकीचे पक्के घर घरातील कोणत्याही सदस्याच्या नावे भारताच्या कोणत्याही भागात असू नये.

याचा अर्थ, लाभार्थी कुटुंबाच्या मालकीचे अगोदरपासून दुकान, व्यावसायिक आस्थापन, भूखंड, कारखाना असेल पण पक्के घर नसेल तर हे कुटुंब पहिल्या घराच्या मालकीहक्कासाठी पात्र ठरते.

 

May I Help You

Submit