सीएलएसएसखाली पात्रतेचे निकष

प्रधानमंत्री आवास योजना सीएलएसएस योजनेखाली सबसिडी प्राप्त करण्याकरता, निम्न उत्पन्न गट/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (एलआयजी/ईडब्ल्यूएस) आणि मध्यम उत्पन्न गट (एमआयजी- १ आणि २) यांच्यासाठी पात्रतेचे निकष स्पष्ट करण्यात आले आहेत.

सीएलएसएस पात्रता निकष:


 • अर्जदार व्यक्ती/कुटुंबाचे देशाच्या कोणत्याही भागात अर्जदाराच्या किंवा कुटुंबियांपैकी अन्य कोणाच्याही नावावर पक्के घर असू नये.
 • अर्जदाराने भारत सरकारच्या गृहनिर्माणाशी संबंधित कोणत्याही केंद्र किंवा राज्य सरकारी योजनेचा लाभ कधीही घेतलेला असू नये.
 • मालमत्ता मालकीमध्ये एका प्रौढ स्त्रीचे सदस्यत्व बंधनकारक आहे.
 • कुटुंबातील स्त्री सदस्य मालमत्तेची सह-मालक असावी.
 • मालमत्तेचे स्थळ २०११ जनगणनेनुसार वैधानिक शहरांमध्ये आणि त्यालगतच्या नियोजित प्रदेशात मोडणारे असावे (याबद्दल सरकार वेळोवेळी माहिती अद्ययावत करत राहते).

*लाभार्थी कुटुंबामध्ये पती, पत्नी, अविवाहित मुलगे आणि /किंवा अविवाहित मुली यांचा समावेश होतो.

तपशीलसीएलएसएस – ईडब्ल्यूएस/एलआयजी
कौटुंबिक उत्पन्न (वार्षिक)सहा लाख रुपयांपर्यंत
सबसिडी मोजण्याचा कालावधी२० वर्षे (पूर्वी १५ वर्षे)
आवश्यक कागदपत्रेअर्जदार, सह-अर्जदार, कुटुंबातील प्रौढ सदस्यांची आधारकार्डे बंधनकारक
गृह उन्नतीकरणसमाविष्ट

तुमच्या कुटुंबाला कोणती योजना लागू ठरेल हे निश्चित करण्यामध्ये पुढे दिलेल्या परिस्थितींचे वर्णन उपयुक्त ठरेल:

 • या परिस्थितीत, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १० लाख रुपये (एमआयजी-१) आहे. कुटुंबाला घर खरेदी करायचे असून ते केवळ कुटुंबातील पुरुष सदस्याच्या नावे असावे, स्त्रीच्या संयुक्त मालकीचे नसावे, अशी कुटुंबाची इच्छा आहे. हे कुटुंब सबसिडीसाठी पात्र आहे?

  उत्तर) हो, एमआयजी योजनेसाठीच्या सीएलएसएसप्रमाणे हे कुटुंब पात्र आहे, कारण स्त्रीच्या मालकत्वाला यात प्राधान्य असले तरी ते बंधनकारक नाही.

 • एका स्त्रीच्या नावावर लग्नापूर्वीपासून घर आहे. लग्नानंतर तिच्या पतीने घर खरेदी केले आणि सबसिडी लाभासाठी अर्ज केला. तो सीएलएसएससाठी पात्र ठरतो का?

  उत्तर) कुटुंबातील पत्नीच्या नावावर पूर्वीपासून घर आहे, त्यामुळे, दुसऱ्या घराच्या खरेदीसाठी हे कुटुंब सबसिडीसाठी पात्र ठरत नाही.

 • एक २३ वर्षांचा तरुण मुलगा त्याच्या आई-वडिलांसोबत राहतो किंवा नोकरीसाठी महानगरात गेला आहे. त्याला घर खरेदी करायचे आहे. तो पत सबसिडीसाठी पात्र आहे? हो, तर का आणि नाही तर का, कारणे द्या.

  उत्तर) कुटुंबाच्या व्याख्येप्रमाणे: "कमावती व्यक्ती (तिचा वैवाहिक दर्जा काहीही असला तरी) एक स्वतंत्र कुटुंब समजली जाते".

  म्हणून, वरील परिस्थितीतील तरुण गृहकर्ज सबसिडीसाठी पात्र आहे. अशा परिस्थितीत, ईडब्ल्यूएस किंवा एलआयजी योजनेसाठी स्त्री सदस्याच्या सहमालकीची आवश्यकताही भासणार नाही.

May I Help You

Submit