प्रधानमंत्री आवास योजना- सीएलएसएससाठी आवश्यक कागदपत्रे

आयआयएफएल गृहकर्ज घेऊन १४०००हून अधिक कुटुंबांनी याआधीच प्रधानमंत्री सीएलएसएस योजनेचा लाभ घेतला आहे. आयआयएफएल गृहदर्ज तुम्हाला मदत करते आणि कर्जासाठी अर्ज करणे हा सुरळीत अनुभव ठरावा यासाठी प्रत्येक पायरीवर मार्गदर्शन करते.

अर्जाच्या पूर्ततेसाठी तुम्हाला आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी आम्ही खाली संकलित करून दिली आहे:

कागदपत्रांचा प्रकार

 • डाउन लोड कऱण्यासाठी येथे क्लिक करा
 • पॅन कार्ड (बंधनकारक) आणि खालीलपैकी कोणतेही एक कागदपत्र

  1. मतदार ओळखपत्र
  2. आधारकार्ड
  3. वैध पासपोर्ट
  4. ड्रायव्हिंग लायसन्स
  5. फोटो असलेले क्रेडिट कार्ड
  6. सरकारी यंत्रणेने जारी केलेले फोटो ओळखपत्र
  7. मान्यताप्राप्त सार्वजनिक अधिकारी किंवा सरकारी कर्मचाऱ्याने ग्राहकाच्या ओळखीची फोटोसह पडताळणी केलेले पत्र (३० दिवसांहून जुने नसावे)
 • खालीलपैकी कोणतेही एक कागदपत्र:

  1. मतदार ओळखपत्र
  2. आधार कार्ड
  3. वैध पासपोर्ट
  4. ग्राहकाची ओळख तसेच पत्त्याची पडताळणी करणारे मान्यताप्राप्त सार्वजनिक अधिकारी किंवा सरकारी कर्मचाऱ्याने दिलेले पत्र
  5. अलीकडील वीज किंवा पाणी (युटिलिटी) बिल
  6. स्टॅम्पपेपरवर झालेला भाडे करार
  7. कर्जदाराचा पत्ता दाखवणारे कोणत्याही व्यावसायिक राष्ट्रीयीकृत बँकेचे स्टेटमेंट
  8. तीन महिन्यांच्या आतले क्रेडिट कार्डाचे स्टेटमेंट
  9. आयुर्विमा पॉलिसी
  10. निवासी पत्ता प्रमाणपत्र /एम्प्लॉयर किंवा कंपनीच्या लेटरहेडवरील पत्र
  11. मालकीची मालमत्ता असल्यास, खरेदीखताची (विक्रीकराराची) प्रत
  12. नगरपालिकेची किंवा मालमत्ता कराची पावती
  13. टपाल कार्यालयातील बचत खात्याचे खातेपत्रक
  14. सरकारी खाती किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमातील निवृत्त कर्मचाऱ्यांना जारी झालेल्या निवृत्तीवेतन किंवा कुटुंब निवृत्तीवेतनाच्या पेमेंट ऑर्डर्सवर त्यांचा पत्ता नमूद असेल, तर त्या पेमेंट ऑर्डर्स (पीपीओ).
  15. राज्य किंवा केंद्र सरकारची खाती, वैधानिक अथवा नियामक यंत्रणा, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सूचित व्यावसायिक बँका, वित्तीय संस्था आणि सूचित कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना निवास उपलब्ध करून दिल्याची जारीकृत पत्रे. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना अधिकृत निवासस्थाने उपलब्ध करून देण्यासाठी झालेले लीव्ह अॅण्ड लायसन्स करार.
  16. सरकारी खात्यांनी जारी केलेली परदेशी अखत्यारीतील कागदपत्रे आणि परराष्ट्र वकिलाती किंवा मिशन इन इंडिया आदींनी जारी केलेली पत्रे
 • खाली दिलेली सर्व कागदपत्रे:

  1. गेल्या दोन महिन्यांची वेतनपत्रके
  2. वेतन खात्याचे गेल्या सहा महिन्यांतील स्टेटमेण्ट
  3. अलीकडील १६ / आयटीआर फॉर्म
 • सध्या चालू असलेल्या कर्जाच्या कागदपत्रांसमवेत परतफेडीचे सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट
 • खाली दिलेली सर्व कागदपत्रे :

  1. मालमत्तेच्या संपूर्ण कागदपत्रांच्या प्रती (लागू असेल तशा)
  2. विक्री कराराची प्रत (करार झाला असेल तर)
  3. घर उपलब्ध झाल्याच्या पत्राची किंवा खरेदीखताची प्रत (लागू असल्यास)
  4. विकासकाला दिलेल्या रकमेच्या पावतीची प्रत (लागू असल्यास)

May I Help You

Submit