FAQs

 

 

तुम्ही भारतीय नागरिक असाल, तुमचे वय १८ ते ७५ दरम्यान असेल, तुम्ही पगारदार किंवा व्यावसायिक असाल तर तुम्ही आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेडकडे गृह कर्जासाठी अर्ज करू शकता.

सहअर्जदार असणे बंधनकारक नाही पण सहअर्जदार असेल तर तुमची पात्रता वाढते आणि गृह कर्ज मंजूर होण्याची शक्यताही वाढते. तुम्ही व्यक्ती असाल तर तुमचे आईवडील, तुमचा जोडीदार किंवा तुमची सज्ञान मुले तुमचे सहअर्जदार होऊ शकतात. तुमच्या प्रॉपर्टीचा सहमालक हा सहअर्जदार असणे बंधनकारक आहे पण सहअर्जदार प्रॉपर्टीचा सहमालक असणे गरजेचे नाही. अवैयक्तिक संस्था म्हणजेच भागीदारी संस्था, एलएलपी किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसुद्धा तुमचे सहअर्जदार असू शकतात.

या ठिकाणी क्लिक करून तुम्ही गृह कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. आमचे कागदोपत्री व्यवहार सोपे आहेत आणि गृह कर्जांना आम्ही तत्काळ मंजुरी देतो. कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी तुम्ही आम्हाला हेल्पलाइन क्रमांक : 1860-267-3000 या क्रमांकावर कॉल करू शकता.

ईएमआय म्हणजे इक्वेटेड मन्थली इन्स्टॉलमेंट (समान मासिक हप्ता). तुमच्या गृह कर्जाची पूर्ण परतफेड होईपर्यंत दरमहा तुम्ही जी विशिष्ट रक्कम भरता, तिला ईएमआय म्हणजेच समान मासिक हप्ता असे म्हटले जाते. त्याचा हिशेब अशा प्रकारे केला जातो की, कर्जाच्या सुरुवातीच्या वर्षांत व्याजाचा हिस्सा जास्त असतो आणि मुद्दल हिस्सा कमी असतो आणि कर्जाच्या मुदतीच्या नंतरच्या टप्प्यात व्याजाचा हिस्सा कमी असतो तर मुद्दल हिस्सा बराच जास्त असतो. आम्ही सर्वांत स्वस्त दरात गृह कर्ज उपलब्ध करून देतो. म्हणजे आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड होम लोनकडून घेतलेल्या कर्जाचा ईएमआय इतरांच्या तुलनेत कमी असतो. त्यामुळे तुमच्या खिशावरील भारही कमी होतो.

जेव्हा तुम्ही गृह कर्जापैकी थोडी रक्कम स्वीकारता तेव्हा तुमच्या गृह कर्जाची पूर्ण रक्कम तुम्हाला दिली जाईपर्यंत तुम्हाला आधी दिलेल्या रकमेवर सरळ व्याज आकारण्यात येते. पार्ट पेमेंटवरील सरळ व्याजाच्या आकारणीला ईएमआयपूर्व व्याज म्हणतात.

तुम्हाला हव्या असलेल्या गृह कर्जाच्या रकमेच्या बदल्यात जी प्रॉपर्टी तुम्ही आमच्याकडे तारण ठेवता त्या प्रॉपर्टीची रास्त किंमत म्हणजे मार्केट व्हॅल्यू. मार्केटची सद्यस्थिती आणि ट्रेंडनुसार आमची खास टीम या मार्केट व्हॅल्यूचे कॅल्क्युलेशन करते.

हो. आयकर कायदा १९६१ नुसार तुमच्या गृहकर्जाची मुद्दल आणि व्याज यावर तुम्हाला कर सवलत मिळते. ही सवलत दर वर्षी बदलू शकत असल्याने तुमच्या कर्जावरील कर सवलत जाणून घेण्याविषयी तुमच्या लोन काउन्सेलर किंवा कर्ज समुपदेशकाकडे चौकशी करा.

बांधकाम प्रक्रिया सुरू असलेली प्रॉपर्टी म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी. जेव्हा तुम्ही अशी अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी बुक करता तेव्हा तुम्हाला भविष्यातील तारखेला प्रॉपर्टीचा ताबा मिळतो.

अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीमध्ये रिअल इस्टेट घेण्यासाठी तुम्ही गृह कर्जासाठी अर्ज करता तेव्हा तुम्हाला हप्त्याहप्त्याने कर्जाची रक्कम देण्यात येते. हे कर्जवाटप आमच्या त्या बांधकामाच्या प्रगतीच्या मूल्यमापनानुसार करण्यात येते. हे टप्पे विकासकाशी केलेल्या करारानुसार असतीलच असे नाही. विकासकाशी करार करताना तुमचे पेमेंट हे बांधकाम टप्प्याशी संलग्न असावे, ते तारखेनुसार नसावे, असे मानणाऱ्या करारालाच तुम्ही संमती द्यावी असा सल्ला आम्ही तुम्हाला तुमच्या हिताकरताच देऊ इच्छितो.

घराची एकूण किंमत आणि तुम्ही घेतलेले गृह कर्ज यातील फरक म्हणजे तुमचे स्वतःचे योगदान. घर विकत घेताना हे योगदान तुम्ही तुमच्या खिशातून देत असता.

आम्ही ज्या प्रॉपर्टीसाठी आर्थिक सहकार्य देऊ करतो, ती प्रॉपर्टी आमच्याकडे गहाण असते आणि /किंवा इतर सांपर्श्विक (कोलॅटरल)/अंतरिम तारण म्हणून आम्ही मागू शकतो. प्रॉपर्टीचे टायटल क्लिअर असावे, ती प्रॉपर्टी विक्रीयोग्य असावी आणि कुणाचाही त्यावर कब्जा नसावा याची खातरजमा तुम्ही करून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. ती प्रॉपर्टी कुठेही गहाण नसावी, त्यावर कर्ज नसावे आणि कोणत्याही प्रकारची याचिका नसावी. कारण त्याचा प्रॉपर्टीच्या टायटलवर विपरित परिणाम होऊ शकतो.

 • भारतीय नागरीक, ज्याच्याकडे भारतीय पासपोर्ट असेल, त्याला एनआरआय गृह कर्ज मिळू शकते.
 • गृह कर्जासाठी अर्ज करणाऱ्या एनआरआय अर्जदार व्यक्तीच्या पासपोर्टवर त्या व्यक्तीला देशात येण्यावर प्रतिबंध घालणारा 'नो एन्ट्री'चा स्टँप नसावा.
 • एनआरआय व्यक्ती अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः येत असेल तेव्हा पासपोर्ट सोबत वैध प्रवेश व्हिसा असावा.
 • पीआयओ/ओसीआयसाठी, परदेशातील पासपोर्टसोबतच वैध पीआयओ/ओसीआयची प्रत दस्तावेजीकरणासाठी असावी.

गृह कर्ज घेणारा एनआरआय खालील देशांमध्ये काम करत आणि वास्तव्यास असावाः

 • उत्तर अमेरिका - अमेरिका आणि कॅनडा
 • मध्य पूर्व आशिया - संयुक्त अरब अमिराती (फक्त दुबई, शारजा, अबुधाबी), रियाध, बहारिन, मस्कत
 • पूर्व आशियातील देश - सिंगापूर, मलेशिया, हाँग काँग, जपान, थायलंड
 • सर्व युरोपिअन देश (अपवाद - स्पेन, ग्रीस, पोर्तुगाल, इटली)
 • ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
 • हो. अर्ज करताना एनआरआय व्यक्ती भारतात असली किंवा नसली तरी सर्व एनआरआय होम लोन्समध्ये निवासी भारतीय पीओए असणे बंधनकारक आहे.
 • जोडीदार पीओएधारक नसू शकतो.
 • निवासी सहकर्जदार पीओए असू शकतो.
 • पीओए सहकर्जदार असू शकतो पण कर्ज घेताना दुसरा सहकर्जदार असेल तर पीओएने सहकर्जदार असणे बंधनकारक नाही.
 

May I Help You

Submit