होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर

|
1L
|
50L
|
1Cr
|
1.5Cr
|
2Cr
Years
|
1Y
|
5Y
|
10Y
|
15Y
|
20Y
|
25Y
|
30Y
%
|
5%
|
10%
|
15%
|
20%
|
25%

ईएमआय
18250

मुद्दल 100000

व्याज 18250

अर्ज करा

घर घेण्याचा विचार करताना, गृह कर्ज किती घ्यावे ही बाब सर्वात महत्त्वाची असते. यातील महत्त्वाचे पैलू हे की, ईएमआयची रक्कम किती असावी आणि सध्याचे मासिक उत्पन्न लक्षात घेता ती रक्कम परवडू शकेल का, याचा विचार करावा. वर दिलेल्या आयआयएफएलच्या होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटरचा वापर करून तुम्ही तुमच्या संभाव्य ईएमआयचा अंदाज करू शकता.

कमी ईएमआय, आकर्षक व्याज दर आणि ३० वर्षांपर्यंतची कर्जाची मुदत यामुळे आयआयएफएल होम लोन्स तुम्हाला तुमचे स्वप्नातले घर लवकरात लवकर घेण्यासाठी आणि कर्जाची परतफेड आरामात करण्यासाठी मदत करतात.

तुम्ही दुसऱ्या बँकेकडून किंवा एनबीएफसीकडून आधीच गृह कर्ज घेतले असेल आणि त्यांच्या सेवेबद्दल असमाधानी असाल किंवा तुम्हाला ईएमआयचे ओझे कमी करवून घ्यायचे असेल तर तुम्ही बॅलन्स ट्रान्सफरसाठी अर्ज करू शकता आणि बचत करू शकता.

“होम लोन ईएमआय म्हणजे काय?”
गृह कर्जाची परतफेड म्हणून कर्ज घेतलेली व्यक्ती दर महिन्याच्या एका निश्चित तारखेला एक ठरावीक रक्कम कर्जदात्याला अदा करते. ईएमआय म्हणजे इक्वेटेड मन्थली इन्स्टॉलमेंट किंवा समान मासिक हप्ता

ईएमआय = मुद्दल + मुद्दलावरचे व्याज. ही रक्कम बँकेला दिलेल्या ऑटो डेबिट सूचनेच्या माध्यमातून किंवा पोस्ट डेटेड चेक्सच्या (धनादेश) माध्यमातून फेडण्यात येते.

“माझा होम लोन ईएमआय कसा कॅल्क्युलेट करतात?”
तुम्ही समान मासिक हप्ता म्हणून किती पैसे भरताय किंवा तुम्ही तुमच्या कर्जदात्याला दरमहा किती रक्कम कर्जाचा हप्ता म्हणून देणार आहात, याची माहिती तुम्हाला असली पाहिजे. मुद्दल, व्याज दर, कर्जाची मुदत आणि गणन पद्धती या घटकांचे एकत्रीकरण करून त्याच्या आधारे तुमच्या ईएमआयची रक्कम कॅल्क्युलेट करण्यात येते.

ईएमआय रकमेचा हिशेब करण्याचा फॉर्म्युला:
emi-calculation

या फॉर्म्युल्यामध्ये ई म्हणजे ईएमआय, पी म्हणजे मुद्दल आणि आर म्हणजे दरमहा व्याज दर. एन म्हणजे कर्जाची मुदत. दरमहा परतफेड करण्याची रक्कम एकच राहते, परंतु कालांतराने त्याचा व्याजापोटी जाणारा हिस्सा कमी होतो आणि मुद्दल हिस्सा वाढतो.

असे असले तरी तुम्हाला किती ईएमआय भरावा लागले हे जाणून घेण्यासाठी आधी तुम्हाला कर्ज किती मिळू शकेल हे समजणे आवश्यक असते. तुमची पात्रता जाणून घेण्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड क्रमांक, जन्म तारीख आणि व्यावसायिक तपशील म्हणजे अस्थापनेचे नाव, उत्पन्नाची स्थिती आणि नोकरीची मुदत हा थोडाफार मूलभूत व्यक्तिगत तपशील द्यावा लागतो. या घटकांचा तुमच्या कर्जावर आकारण्यात येणाऱ्या व्याज दरावर प्रभाव पडत असतो. वेळेवर परतफेड करण्यासाठी तुम्हाला तुमच्या ईएमआयची अचूक रक्कम आगाऊ माहीत असणे महत्त्वाचे असते. ईएमआयच्या रकमेवरून तुम्हाला कर्ज परवडू शकते किंवा परवडू शकत नाही याचे अनुमान लावता येते.

पात्रता निकष जाणून घ्या
उदाहरण -
५ वर्षांच्या व्यावसायिक अनुभवासह अभिजीत दरमहा रु. ७०,००० इतके उत्पन्न मिळवतात. त्यांना ५०,००,००० रुपये किमतीची प्रॉपर्टी विकत घ्यायची आहे. त्यांच्या पगारावर त्यांना किती कर्ज मिळू शकेल? त्याचा ईएमआय किती असेल?

या पगारावर गृह कर्जाची एकूण रक्कम अंदाजे रु. ४२,५०,००० असेल आणि ईएमआय रु. ४०,०३३ इतका असेल आणि हा ईएमआय त्यांना २० वर्षे मुदतीसाठी लागू राहील.


 

May I Help You

Submit