Eligibility Calculator

eligibilitycalculator

गृह कर्ज पात्रता कॅल्क्युलेटर

गृह कर्जासाठी अर्ज करताना कुणाच्याही मनात पहिला प्रश्न हा येतो की, "माझ्या पगारावर मला किती गृह कर्ज मिळू शकेल?" त्याचप्रमाणे इतरही काही महत्त्वाचे प्रश्न पडतात जसे की -

“माझा ई. एम. आय. किती असेल?”

“माझे कर्ज फेडण्यासाठी मला किती वेळ लागेल?”

“कोणते लेखी व्यवहार करावे लागतील?”

आयआयएफएल होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटरचाउपयोग करून तुम्हाला ईएमआयची रक्कम त्वरित कळू शकेल. तुम्ही अमूक एक रकमेचे कर्ज क्ष% व्याज दराने २०, २५ किंवा ३० वर्षांच्या कालावधीसाठी घेतले तर तुमचा ईएमआय किती असेल हे तुम्ही तपासून घेऊ शकता. पण तुमचा पगार आणि इतर मासिक हप्ते लक्षात घेऊन तुम्हाला किती कर्ज मिळू शकेल, हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही आयआयएफएल होम लोन एलिजिबिलिटी कॅल्क्युलेटरचा (गृह कर्ज पात्रता कॅल्क्युलेटर) उपयोग करून पाहायलाच हवा

या होम लोन एलिजिबिलिटी कॅल्क्युलेटरचे वैशिष्ट्य हे की, हा कॅल्क्युलेटर तुमच्या वेळेची बचत करतो आणि अचूक निष्कर्ष देतो. पात्रता कॅल्क्युलेट करण्यासाठी युझरला पॅन क्रमांक, जन्म तारीख तारीख आणि व्यावसायिक तपशील म्हणजे अस्थापनेचे नाव, उत्पन्नाची स्थिती आणि नोकरीची मुदत हा थोडाफार मूलभूत व्यक्तिगत तपशील द्यावा लागतो. एकदा हा तपशील प्रविष्ट केला की, काही सेकंदांमध्ये तुमच्यासमोर निष्कर्ष येतो.

पात्रता निकषः

  • भारतीय नागरिक
  • १८ ते ७० वयोगट
  • पगारदार किंवा स्वयंरोजगार
  • तुमचा जोडीदार, जवळचे नातेवाईक, भागीदारी संस्था, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हे सहअर्जदार असू शकतात.

टिपः जॉइंट लोन किंवा सहअर्जदारासोबत कर्जासाठी अर्ज केला तर तुमच्या कर्ज पात्रतेचे मूल्य वाढते आणि कर्ज लवकरात लवकर मंजूर होण्याची शक्यताही वाढते.

May I Help You

Submit