गृह कर्ज

आमच्याकडून गृह कर्ज (होम लोन) घेणे ही अत्यंत वेगवान आणि सुलभ प्रक्रिया आहे. आयआयएफएलकडून आर्थिक सहकार्य आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुम्हीसुद्धा हक्काच्या घराचे मालक होऊ शकता. तुम्ही नोकरदार असा वा व्यावसायिक असा, रो हाऊस, बंगला, फ्लॅट किंवा प्लॉट घेण्यासाठीसुद्धा तुम्हाला अत्यंत वाजवी व्याज दरात गृह कर्ज मिळू शकते. वेगवान प्रक्रिया आणि वाजवी ईएमआय यामुळे आयआयएफएलकडून घेतलेले गृह कर्ज हे नव्या किंवा अनुभवी घरखरेदीदारांची सर्वोत्तम निवड ठरते. घर खरेदी करण्याची प्रक्रिया अधिक सोपी व्हावी यासाठी आम्ही तज्ज्ञांकडून कायदेशीर सल्ला आणि तांत्रिक समुपदेशनही उपलब्ध करून देतो. तुमचे स्वप्न वास्तवात उतरविण्यासाठी आम्ही तुमची मदत करू इच्छितो.

Home Loan - Features And Benefits

  • लवकर आणि भांडण मुक्त कर्ज
  • आकर्षक व्याज दर ८.४५%* पासून पुढे
  • परवडणारा ई एम आय
  • पगाराच्या २० वर्षापर्यंत कर्जाचा कालावधी
  • स्वयंरोजगारासाठी २० वर्षापर्यंत कर्जाचा कालावधी

Types of Home Loan

new-home-loan

 new-home-loan-icon

नव्या घरासाठी कर्ज

वेगवान प्रक्रिया आणि सोप्या लेखी व्यवहारांसह आयआयएफएलकडून गृह कर्ज घ्या आणि विलंब न लावता तुमच्या स्वप्नातल्या घराचे मालक व्हा.

swaraj-home-loan

Swaraj Home Loan

स्वराज होम लोन

प्रथमच घर खरेदी करणाऱ्या ज्या व्यक्तींकडे उत्पन्नाची औपचारिक कागदपत्रे नाहीत, अशा खूप साऱ्या व्यक्तींसाठी स्वराज होम लोनच्या माध्यमातून आयआयएफएल तर्फे होम लोनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते

 home-extension-or-improvement-loan

Home Extention

होम इम्प्रूव्हमेंट लोन

आपल्या घराचे सुशोभीकरण करण्याचा विचार केला असेल तर आयआयएफएलच्या होम इम्प्रूव्हमेंट लोनच्या माध्यमातून तुम्हाला विना अडथळा व लवकरात लवकर कर्ज उपलब्ध होईल, याची खात्री बाळगा.

IIFL Home Loan Balance Transfer

Balance Transfer

बॅलेन्स ट्रान्सफर

तुमच्या जुन्या कर्जदात्याचे व्याज दर जास्त असतील किंवा त्याच्या सेवेबद्दल तुम्ही असमाधानी असाल- मग त्याचे कारण काहीही असो, तर तुम्ही शिल्लक गृह गर्ज अत्यंत सुलभतेने आणि सोप्या पद्धतीने आयआयएफएल होम लोनमध्ये ट्रान्सफर करू शकता.

nri-home-loan

NRI Home Loan

एनआरआय गृह कर्ज

तुम्ही कुठेही स्थायिक झालेले असा, जर तुम्ही एनआरआय असाल तर आयआयएफएल एनआरआय होम लोन्सच्या माध्यमातून भारतात घर किंवा प्रॉपर्टी विकत घेऊ शकता.

ईएमआय कॅल्क्युलेटर

|
1L
|
50L
|
1Cr
|
1.5Cr
|
2Cr
वर्षे
|
1Y
|
5Y
|
10Y
|
15Y
|
20Y
|
25Y
|
30Y
%
|
8.70%
|
12.8%
|
16.9%
|
20.9%
|
25%

ईएमआई
18250

मुद्दल 100000

व्याज 18250

अर्ज करा

Home Loan FAQs

तुम्ही भारतीय नागरिक असाल, तुमचे वय १८ ते ७५ दरम्यान असेल, तुम्ही पगारदार किंवा व्यावसायिक असाल तर तुम्ही आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेडकडे गृह कर्जासाठी अर्ज करू शकता.

सहअर्जदार असणे बंधनकारक नाही पण सहअर्जदार असेल तर तुमची पात्रता वाढते आणि गृह कर्ज मंजूर होण्याची शक्यताही वाढते. तुम्ही व्यक्ती असाल तर तुमचे आईवडील, तुमचा जोडीदार किंवा तुमची सज्ञान मुले तुमचे सहअर्जदार होऊ शकतात. तुमच्या प्रॉपर्टीचा सहमालक हा सहअर्जदार असणे बंधनकारक आहे पण सहअर्जदार प्रॉपर्टीचा सहमालक असणे गरजेचे नाही. अवैयक्तिक संस्था म्हणजेच भागीदारी संस्था, एलएलपी किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसुद्धा तुमचे सहअर्जदार असू शकतात.

या ठिकाणी क्लिक करून तुम्ही गृह कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. आमचे कागदोपत्री व्यवहार सोपे आहेत आणि गृह कर्जांना आम्ही तत्काळ मंजुरी देतो. कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी तुम्ही आम्हाला हेल्पलाइन क्रमांक : 1860-267-3000 या क्रमांकावर कॉल करू शकता.

ईएमआय म्हणजे इक्वेटेड मन्थली इन्स्टॉलमेंट (समान मासिक हप्ता). तुमच्या गृह कर्जाची पूर्ण परतफेड होईपर्यंत दरमहा तुम्ही जी विशिष्ट रक्कम भरता, तिला ईएमआय म्हणजेच समान मासिक हप्ता असे म्हटले जाते. त्याचा हिशेब अशा प्रकारे केला जातो की, कर्जाच्या सुरुवातीच्या वर्षांत व्याजाचा हिस्सा जास्त असतो आणि मुद्दल हिस्सा कमी असतो आणि कर्जाच्या मुदतीच्या नंतरच्या टप्प्यात व्याजाचा हिस्सा कमी असतो तर मुद्दल हिस्सा बराच जास्त असतो. आम्ही सर्वांत स्वस्त दरात गृह कर्ज उपलब्ध करून देतो. म्हणजे आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड होम लोनकडून घेतलेल्या कर्जाचा ईएमआय इतरांच्या तुलनेत कमी असतो. त्यामुळे तुमच्या खिशावरील भारही कमी होतो.

Read More

Learn with IIFL

आयआयएफल जीवन कसे बदलून टाकत आहे

Vankireddy Hemalath

कर्ज घेण्याची प्रक्रिया इतकी सोपी केल्याबद्दल मी आयआआयएफलच्या होम लोन टीमला मनापासून धन्यवाद देतो. या संदर्भात तुम्ही केलेल्या प्रयत्नांबद्दल तुमची प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे. धन्यवाद.

वंकीरेड्डी हेमलथ
Raghavareddy Devarapalli

मी राघवरेड्डी देवरपल्ली. आयआयएफल होमलोन्स टीमची सेवा घेताना मी खरेच आनंदात होतो आणि आयआयएफल होम लोन्स टीमसोबत जोडले जाणे हा खरोखर माझा सन्मान आहे. मी माझ्या मित्रांना आणि परिवारातील सदस्यांना आयआयएफएलची शिफारस करेन.

राघवरेड्डी देवारपल्ली

May I Help You

Submit