आयआयएफएल बाँड्ससह तुमच्या गुंतवणुकीवर १०.५०% परतावा मिळविण्याची संधी

Jan 23, 2019 7:30 IST 9677 views

रिटेल गुंतवणूक करणाऱ्या ज्या गुंतवणूकदारांना गुंतवणूकीवर जास्तीत जास्त परतावा हवा आहे त्यांना आयआयएफएलच्या नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्सच्या (एनसीडी) पब्लिक इश्युमध्ये गुंतवणूक करून १०.५० टक्क्यांपर्यंत परतावा मिळविण्याची संधी आहे. बाजारपेठेशी संलग्न असलेली गुंतवणूक अशाश्वत असण्याच्या आणि मुदत ठेवीतून केवळ ६-७% परतावा मिळण्याच्या वातावरणात १०.५०% पर्यंत परतावा मिळण्याची संधी चुकवू नये अशीच आहे. 
निश्चित उत्पन्न असलेल्या गुतंवणूकदारांना मिळणारा कमी परतावा लक्षात घेत आयआयएफएलतर्फे ऑफर करण्यात येणारे आणि कमाल परतावा देणारे बाँड्स हे गुंतवणूकदारांसाठी अच्छे दिन सूचित करत आहेत. एनसीडी हे बहुधा एक्चेंजमध्ये सूचीबद्ध (लिस्टेड) असतात आणि दिलेल्या मुदतीत बाजारपेठेत त्यांची खरेदी-विक्री करता येते आणि डिमॅट खाते असलेला कुणीही गुंतवणूकदार त्यात गुंतवणूक करू शकतो.  
आयआयएफएलतर्फे इश्यु करण्यात आलेले एनसीडी बीएसई आणि एनएसईमध्ये लिस्टेड असतील आणि गुंतवणूकदारांना लिक्विडिटी प्रदान करतील. गुंतवणूकदार दरमहा वा वार्षिक परताव्याचा पर्याय स्वीकारू शकतात आणि याची मुदत १२० महिन्यांची असेल. त्याचप्रमाणे ३९ किंवा ६० महिन्यांची मुदतही उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे दर साल १०.३५% या दराने आयआयएफएलचे संस्थात्मक विभागासाठी असलेले बाँड्सही उपलब्ध आहेत. 
आयआएफएल ग्रुपच्या आयआयएफएल फायनान्सतर्फे आपल्या बाँड्सचा पब्लिक इश्यु २२ जानेवारी २०१९ रोजी खुला करण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर हे बाँड्स देण्यात येतील. त्यांचे दर्शनी मूल्य रु. १,००० असेल आणि सर्व विभागांमध्ये किमान अर्ज आकार रु. १०,००० इतका असेल. 
या सिक्युअर्ड आणि अनसिक्युअर्ड रीडिमेबल नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्सच्या माध्यमातून व्यवसायवृद्धी आणि विस्तारीकरणासाठी रु. २,००० कोटी उभे करण्याची आयआयएफएलची योजना आहे. या एनसीडीवर प्रतिक्रिया देताना आयआयएफएलचे ग्रुप सीएफओ श्री. प्रबोध अग्रवाल म्हणाले, "या माध्यमातून उभ्या राहिलेल्या निधीचा वापर ऑनवर्ड लेंडिंग, वित्तपुरवठा आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी केला जाईल. यापूर्वी आलेला आयआयएफएल ग्रुपच्या प्रत्येक बाँडला प्रमाणापेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला आणि त्यांचा वेळेवर परतावा देण्यात आला."
डिबेंचर्स नेहमी प्रस्थापित, कॅश-फ्लो मुबलक प्रमाणात असलेल्या आणि उच्च मानांकन असलेल्या कंपन्यांकडून घ्यावेत, अशी शिफारस सल्लागारांकडून करण्यात येते आणि आयआयएफएल या सगळ्या निकषांची पूर्तता करते. आयआयएफएलचा समृद्ध असा २३ वर्षांचा इतिहास आहे आणि वित्तसेवा क्षेत्रात ही एक अत्यंत आदर प्राप्त असलेली कंपनी आहे. या कंपनीची उपकंपनी असलेल्या आयआयएफएल फायनान्सतर्फे अत्यंत दमदार वित्तीय कामगिरी केली असून ३० सप्टेंबर २०१८ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये रु. ३५७.२० कोटी इतक्या करोत्तर नफ्याची नोंद केली असून गेल्या वर्षीच्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत ही वाढ ६९% होती. आयआएफएल फायनान्स हे मुबलक भांडवल असलेली एनबीएफसी असून त्यांची ३० सप्टेंबर २०१८ रोजी त्यांची एकूण संपत्ती रु. ४,००० कोटी इतकी होती आणि टोटल कॅपिटल अॅडिक्वसी रेश्यो (सीएआर) १८.७% होता. यात टिअर १ भांडवल १५.६% आहे, ज्याची बंधनकारक आवश्यकता अनुक्रमे १५% व १०% आहे. त्याचप्रमाणे क्रिसिलने या इन्स्ट्रुमेंटला एए/स्थिर मानांकन दिले आहे, त्यातून उच्च दर्जाची सुरक्षितता, वित्तीय दायित्वाची वेळेवर सेवा आणि यात कसूर होण्याची शक्यता किमान आहे. 

Tags:

 

May I Help You

Submit